श्रावणसरी
- Aarti Manjarekar
- Sep 7, 2021
- 1 min read
Updated: Mar 1

गेल्या बरसुनी साऱ्या जरी श्रावणाच्या सरी
रिती ओंजळ राहिली थेंब नुरले गं करी
गेला मृद्गंध विरून, इंद्रधनू हरवले
धरा ओलेती हिरवी परी मन तहानले
दाटे हुरहुर कैसी चिंब पाखराच्या ऊरी
कोणा घालावी मी साद, कोणासाठी रे भरारी
वाटे चालावी सोबत, वाट ओली अनवट
पावसाचे गात गाणे दोघे एकाच सुरात
ऊन पावसाची वीण परी दिसेना दिठीस
तुझे अस्तित्व केवळ दृश्य आभास आभास
आरती मांजरेकर
७ सप्टेंबर २०२१
सुरेख लिहितेस