विश्लेष
- Aarti Manjarekar
- Jul 10, 2022
- 1 min read
Updated: Mar 1
या मूक भावनांना वाक् स्पर्श सोसवेना
नभी भावाकुल मेघाला, गहिवर सावरेना
ना पाहिले मी डोळा ना साद ऐकली मी
मिटल्या नयनातील रूपा उघडून भंगवेना
नाहते तुझ्या श्वासात रोमांचित होते काया
ह्या अनुभूतीस मजला आभास बोलवेना
हितगुज सांगताना मी सन्निध तुझ्याच आहे
देहातील अंतर माझ्या हृदयाला जाणवेना
तव परिमळ आठवांचा मजभवती भरून राही
अशात तुझ्या नसण्याला मज विरह बोलवेना
हे दुःख हवेहवेसे, वेदना हवीशी वाटे
भळभळत्या हातातूनही हे खड्ग सोडवेना
आरती मांजरेकर
९ जुलै २०२२

Superb