प्राजक्त...
- Aarti Manjarekar
- May 30, 2021
- 1 min read
Updated: Mar 1
श्रावणातला सजल सुगंध
धवल वर्ण तव सात्त्विकतेचा,
दुग्धपांढरी गंधफुले अन्
देठ केशरी वैराग्याचा !
अंधारातून फुलून येशी
धरेस अर्पण झांजरवेळी,
क्षणिक जीवन, कुणी मांडले
असले प्राक्तन तुझ्याच भाळी ?
ना विषाद क्षणभंगुरतेचा
देहांताची नसे यातना,
टिपले प्रेमे अलगद त्याते
आत्मसमर्पण हीच भावना!?
आरती मांजरेकर
१४ मे २०२१
अक्षय्य तृतीया

खुपच सुंदर...
Khupach chhan