गुंजारव
- Aarti Manjarekar
- Jul 11, 2021
- 1 min read
Updated: Sep 10, 2023
रे कुसुमाकर, कुसुम दलावर
अधीर भ्रमर बघ रुंजतसे
रेशीमस्पर्शाने अन् सुमने
सुमनासी त्या चुम्बितसे
आतुर नवथर प्रणयाराधन
अबोध मन ही उमगतसे
मीलन संकेताने, हळवे
फूल थरारे अलगदसे
वसंतासवे अनंग प्रणयी
शृंगारा त्या पाहतसे
मधुकराचा गुंजारव अन्
ग्रीष्मालाही रोखतसे
आरती मांजरेकर
१० जुलै २०२१

छान लिहितेस. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन