top of page
Search

चकवा

  • Writer: Aarti Manjarekar
    Aarti Manjarekar
  • Oct 16, 2021
  • 1 min read

Updated: Sep 10, 2023



वर्षानुवर्ष पायपीट करून

तिथेच पोहोचतो सारे फिरून

हा चकवा नाही तर काय आहे?

गाव दिसतं, पण फक्त दुरून !


सारे म्हणतात, खुळीच आहेस,

चकवा फक्त जंगलात लागतो

सांजवेळी घुबड ओरडलं ना

की वाटसरूला चकवा मारतो


वासना द्वेष संशय सूडभाव

सारे काय अशुभ पिशाच नाही?

रात्री अपरात्री अवती भवती

इथं का हुमण ऐकू येत नाही?


अरण्यात श्वापदंच असतात

ती एकवेळ वाट दाखवतील

पण इथे असतो हिंस्र मानव

तो लचके तोडेल, जीव घेईल


तरीही गाव गाठायचं असतं

प्राण कंठाशी आले असले आणि

मति सुन्न झाली असली तरीही

तिथे पोहोचणं जरुरी असतं


तो पराधीन अगतिक फिरस्ता

अंधाऱ्या वाटेवर दिवटी घेऊन

करतच रहातो मग भ्रमण

अद्भुत रानवाटच समजून


किंवा आहे तिथेच बसून राहतो

शुक्राची चांदणी उगवेपर्यंत

रानभूल जाण्याची वाट पाहतो,

हिमतीने, ती वेळ येईपर्यंत !

आरती मांजरेकर

१३ ऑक्टोबर २०२१

 
 
 

Comentarios


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by रत्नप्रभा. Proudly created with Wix.com

bottom of page