
रत्नप्रभा
About us
फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही !
(संत तुकाराम)
मराठी साहित्यविश्वाला अनेकोत्तम प्रतिभावान रत्न प्राप्त झाली आणि त्या रत्नांची प्रभा आपल्या सर्वांच्या जीवनात मार्ग प्रकाशित करण्याचे काम अविरतपणे करत आहे. या प्रकाशवाटांवरून विहार करत असताना ओंजळीत किती जरीआनंदाचे क्षण वेचून गोळा करावे म्हटले तरी ‘अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी आपला स्थिती होते. पण तरीही एकीकडे माझ्या दुबळ्या झोळीत माझ्या क्षमतेप्रमाणे का होईना जमेल ते क्षण वेचत रहाण्याचा आणि दुसरीकडे ते आपल्या प्रियजनांत वाटण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे; माझ्या अल्पशा कुवतीनुसार !!
ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायात एक ओवी आहे,
राजहंसाचे चालणे | जगी जालिया शहाणे | म्हणोनी कवणे काय | चालोचि नये ॥
त्यावर विश्वास ठेवून हे धार्ष्ट्य करत आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत.
शुभेच्छा !!